Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने, महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपाच्या वतीने महापौर पदासाठी दीपमाला काळे यांनी तर उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांनी अर्ज भरला आहे.
विरोधकांकडून एकही अर्ज नाही!
दुसरीकडे मात्र, विरोधनाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने, महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे.
‘बिनविरोध’ निवड होण्याची शक्यता
भाजपच्या दीपमाला काळे व शिंदेसेनेचे मनोज चौधरी दोघेही नगरसेवक म्हणून ‘बिनविरोध’ निवडून आले असून, आता महापौर आणि उपमहापौर म्हणूनही त्यांची ‘बिनविरोध’ निवड होण्याची दाट शक्यता आहे.








