Jalgaon Crime News: रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील रिधूर गावात घडली. गुरांच्या शेडसाठी वापरच्या रस्त्यात खड्डे खोदल्यामुळे हा वाद होत पाच जणांच्या टोळीने दोन भावांवर लोखंडी पहार आणि दांडक्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत दोघं भावांची डोकी फोडल्याची ते गंभीर आहे. रविवार 18 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता घडलेल्या या घटनेबाबात रात्री ११ वाजता पाच जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबात माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रिधूर येथील रहिवासी धनराज बुधा पाटील (वय 51) व त्यांचा भाऊ वसंत पाटील हे रविवारी 18 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या घरापाशी होते. यावेळी त्यांच्या वापराच्या रस्त्यामध्ये गावातीलच शरद एकनाथ कोळी हा गुरांच्या शेडसाठी खड्डे खोदून बांधकाम करत होता. सार्वजनिक वापराच्या या रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने पाटील बंधूंनी त्यास विरोध केला.
पाटील बंधूंनी विरोध केल्याचा राग आल्याने शरद एकनाथ कोळी, विशाल ईश्वर कोळी, अजय ईश्वर कोळी, अनिताबाई शरद कोळी आणि अक्षय सुर्यभान कोळी यांनी पाटील बंधूंना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत होत शरद कोळी याने हातातील जड लोखंडी पहारीने वसंत पाटील यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात वसंत पाटील यांचे डोके फुटून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. तर विशाल कोळी याने लाकडी दांडक्याने धनराज पाटील यांच्या डोक्यावर वार करून त्यांनाही जखमी केले.
या प्रकरणी धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीचत आहे.










