होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon weather update : अवकाळी पावसाचे संकट, आगामी चार दिवस असं राहणार हवामान?

On: January 22, 2026 6:02 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon weather update : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. दरम्यान, आगामी चार दिवस जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहून, काही भागात किरकोळ पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जळगाव शहरात बुधवारी पहाटे काही प्रमाणात धुके पहायला मिळाले, त्यासह ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत सूर्याचे दर्शनही झाले नव्हते. दुपारी १ नंतर थोड्या प्रमाणात ऊन पडले, मात्र थंड वारे वाहत असल्याने हवेत दिवसभर गारवा जाणवत होता.

गेल्या काही दिवसांप्रमाणे रात्रीचे तापमान ११ अंशांवर स्थिर असले, तरी ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा थंडी जाणवू लागली आहे.

तापमानात वाढ होण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी चार दिवस जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहून, काही भागात किरकोळ पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे ढगाळ वातावरणामुळे रोखले गेल्याने, रात्रीच्या किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment