Jalgaon Weather Update : गेल्या काही दिवसांपासून जळगावकरांना दुहेरी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. अशात ही स्थिती अजून १५ दिवस कायम राहणार असून, फेब्रुवारी अखेरनंतर दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही वाढ होत जाणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगावकरांना दुहेरी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. एकीकडे फेब्रुवारी महिना सुरू झाल्यामुळे आता हळूहळू दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा बदलल्यानंतर रात्रीदेखील तापमानाचा पारा १३ अंशावर घसरल्याने बन्यापैकी गारवा जाणवत आहे.
दरम्यान, दिवसा ऊन व रात्रीच्या वेळी गारवा ही स्थिती अजून १५ दिवस कायम राहणार असून, फेब्रुवारी अखेरनंतर दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही वाढ होत जाणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
आगामी पाच दिवसातील तापमानाची स्थिती
┌──────────────┬──────────────┬──────────────┐
│ दिनांक रात्रीचा पारा दिवसाचा पारा
├──────────────┼──────────────┼──────────────┤
│ ९ फेब्रुवारी १२° ३१°
│ १० फेब्रुवारी १२° ३०°
│ ११ फेब्रुवारी १४° ३१°
│ १२ फेब्रुवारी १५° ३२°
│ १३ फेब्रुवारी १६° ३३°
└──────────────┴──────────────┴──────────────┘








