होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Kidney Disease Symptoms: सावधान! ‘ही’ लक्षणे देतात मूत्रपिंडाच्या आजाराचे संकेत, दुर्लक्ष करणं बेतू शकतं जिवावर

On: March 4, 2026 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Kidney Disease Symptoms: शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचं आहे. त्यात मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंड रक्तातील अशुद्धता आणि विषारी पदार्थ फिल्टर करतं आणि शरीरातील द्रव संतुलन राखण्यात मदत करते. जर मूत्रपिंडाची योग्य काळजी घेतली गेली नाही तर विविध प्रकारचे रोग उद्भवू शकतात. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मूत्रपिंडाचा आजार अनेकदा हळूहळू निर्माण होतो. जेव्हा स्थिती अधिक गंभीर होते तेव्हाच ही समस्या लक्षात येते. त्यामुळे मूत्रपिंडाच्या समस्येबाबातच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते. आजच हा लेख त्याच विषयावर असून आपण या लेखातून जाणून घेऊया मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे.

 

मूत्रपिंडांचा त्रास का होतो?

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, मूत्रपिंडाचा आजार म्हणजे मूत्रपिंडाच्या कार्यातील कोणताही बिघाड. यामध्ये मूत्रपिंडाचे संसर्ग, दीर्घकालीन आजार, मुतखड्याची समस्या, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आणि पॉलीसिस्टिक यांचा मूत्रपिंडाच्या आजारात समावेश होतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धूम्रपान आणि मूत्रपिंड निकामी होणाचा अनुवंशिक दोष या परिस्थितींमुळे मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हा धोका जास्त असतो.

 

मूत्रपिंड आजाराची लक्षणे?

मूत्रपिंडाचा आजारात सुरुवातीला बहुतेकदा लक्षणे दिसत नाही. परंतु, समस्या जसजशी वाढते तसतसे काही लक्षणे दिसू लागातात.

– जसे की वारंवार लघवी होणे.

– घोट्यांमध्ये आणि पायांमध्ये सूज येणे.

– भूक न लागणे आणि वजन कमी होणे.

– डोळ्यांभोवती सतत सूज येणे.

– स्नायू पेटके येणे आणि झोपेचा त्रास होणे.

– लघवीमध्ये रक्त किंवा फेस येणे.

– कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा.

– श्वास घेण्यास त्रास होणे.

ही प्रमुख लक्षणे मूत्रपिंडाच्या समस्येत दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

 

‘या’ चाचण्या आहेत आवश्यक

वरील लक्षणे दिसल्यास, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. नियमित चाचणीमुळे ही समस्या लवकर ओळखता येते. सामान्य चाचण्यांमध्ये सीरम क्रिएटिनिन, सिस्टॅटिन सी, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, रक्तातील युरिया नायट्रोजन, लघवीच्या चाचण्या आणि लघवीतील अल्ब्युमिन-क्रिएटिनिन गुणोत्तर यांचा समावेश होतो.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment