Ladki Bahin Yojana : अद्याप ई-केवायसी पूर्ण न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून पुन्हा आजपासून (दि. 6 फेब्रुवारी 2026) ई-केवायसी पोर्टल सुरू करण्यात आले असून, आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी तक्रारी दाखल केल्या, तर काही भागात आंदोलनेही झाली.
या पार्श्वभूमीवर विभागाने गंभीर दखल घेत लाभार्थींच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच नियमबाह्य पद्धतीने सादर दिलेल्या अर्जाची छाननी सुरु केली आहे. दरम्यान, पुन्हा आजपासून ई-केवायसी पोर्टल सुरू करण्यात आले असून, आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
काहींना 4500 तर काहींना मिळणार फक्त 1500
नव्या नियमानुसार, ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळाले नाही, त्यांना फेब्रुवारी महिन्यात एकत्रित 4500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. तर काही लाभार्थींना महापालिका निवडणुकांमुळे जानेवारीत केवळ हप्ता देण्यात आला होता. त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता नियमितपणे दिला जाईल.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)










