होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Manmad-Indore Railway Update : मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी लळिंग शिवारात होणार भूसंपादन

On: January 21, 2026 9:57 AM
Follow Us:
---Advertisement---

Manmad-Indore Railway Update : मनमाड- इंदूर रेल्वे प्रकल्पांतर्गत बोरविहीर नरडाणा या पहिल्या टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. आता यासाठी धुळे तालुक्यातील इतर गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात सर्वाधिक भूसंपादन धुळे तालुक्यातील लकिंग शिवारात होणार असून भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे राजपत्रातून प्रसिद्ध झाली आहेत.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील दळणवळण अधिक सुलभकरणान्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यात काही गावांचे भूसंपादन पूर्ण होऊन रेल्वे रुळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात धुळे ते पुरमेपाडा गाव शिवार दरम्यान विविध गावांमध्ये रेल्वे विभागाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे राजपत्रात जाहीर करण्यात आली आहेत.

या टप्प्यात सर्वाधिक भूसंपादन धुळे तालुक्यातील लळिंग गाव शिवारात होणार असून एकूण १०६१ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे संपादन करण्यात येत आहे. या प्रकल्पात एवढ्या मोठ्या संख्येने भूसंपादन होणारे लळिंग हे धुळे तालुक्यातील एकमेव गाव शिवार आहे.

बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील कामाला गती आलेली असतानाच धुळे तालुक्यातील इतर गावातील भूसंपादनाची यादी रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावातील एकूण ७७ शेतकरी यामुळे बाधित होणार आहेत. आर्वी गावातील एकूण २०६ शेतकरी बाधित होणार आहेत.

लळिंग गाव शिवारातील सर्वाधिक म्हणजे एकूण १०६१ शेतकरी बाधित होणार आहेत. रानमळा गाव शिवारातील एकूण ९८ शेतकरी बाधित होणार आहेत. सावळदा गाव शिवारातील एकूण ४८ शेतकरी बाधित होणार आहेत. अवधान गाव शिवारातील एकूण ४१ शेतकरी, पिपरी गाव शिवारातील एकूण २८१ शेतकरी, वडजाई गाव शिवारातील एकूण २२ शेतकरी, बाळापूर गाव शिवारातील एकूण ५७ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होत आहे.

प्रकल्पाच्या कामाला गती मिळाल्याने समाधान

मनमाड – इंदूर रेल्वे मार्गासाठी अनेक व्यक्ती, संघटनांनी लढा देऊन पाठपुरावा केला. वेळोवेळी जनहित याचिकादेखील दाखल झाल्या. यात महाराष्ट्रातील धुळे जिल्हा आणि मध्य प्रदेशातील सेंधवा भागातील संघटना, संस्था, राजकीय नेते आणि जनतेचे मोठे योगदान राहिले आहे. आज प्रत्यक्षात हा प्रकल्प साकारला जात असत्याचे पाहून सर्वांनाच समाधान होत आहे, असे मत मनमाड इंदूर रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष मनोज मराठे यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment