होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Mahashivratri 2026 : यंदा कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तिथी, मुहुर्त अन् शुभ योग

On: January 30, 2026 1:20 PM
Follow Us:
---Advertisement---

Mahashivratri 2026 : हिंदू धर्मात देवांचे देव महादेवाला विशेष महत्त्व आहे. अर्थात महाशिवरात्री हा हिंदूंसाठी एक अतिशय खास सण आहे. महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पवित्र मिलनाचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुसंवादी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते. शास्त्रांनुसार, महाशिवरात्री शिवाकडून आशीर्वाद घेण्याची सुवर्णसंधी देते. चला तर मग जाणून घेऊया यंदा कधी आहे महाशिवरात्री.

‘या’ दिवशी आहे महाशिवरात्री

पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा फाल्गुन महिन्याची चतुर्दशी तिथी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून ०४ मिनिटांनी प्रारं होईल. ही तिथी १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत राहील. हिंदू धर्मानुसार, शिवपुजा ही प्रदोष काळात केली जाते. त्यानुसार, महाशिवरात्री, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल.

महाशिवरात्रीला जुळून येताय शुभ योग

यंदा महाशिवरात्रीला विशेष शु योग जुळून येताय. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. यासह उत्तरा आषाढ आणि श्रावण नक्षत्रांचा युती देखील होईल. धार्मिकदृष्ट्या हे योग अत्यंत शुभ मानले जातात. तर व्यतिपात योग दिवसभर राहील.

कुंभ राशीत सूर्य, बुध, राहू आणि शुक्र यांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल. या काळात पूजेदरम्यान भक्तांनी शिवाशी संबंधित मंत्रांचा जप करणे खूप लाभदायक ठरु शकते.

या मंत्रांचा करा जप

पूजेसाठी पहिला प्रहारचा मंत्र – ‘ह्रीं ईशानाय नमः

पूजेसाठी दुसऱ्या प्रहारचा मंत्र – ‘ह्रीं अघोराय नमः

पूजेसाठी तिसऱ्या प्रहारचा मंत्र – ‘ह्रीं वामदेवाय नमः

पूजेसाठी चौथ्या प्रहारचा मंत्र – ‘ह्रीं सद्योजताय नमः

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोत आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment