होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Varangaon News: महावितरणतर्फे तपासणीची धडक मोहीम! वीज चोरीचा पर्दाफाश, दोषींवर होणार कारवाई

On: February 19, 2026 3:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News:  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे (महावितरण) वरणगाव उपविभागात शहरातील विविध भागांत वीज चोरीविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या तपासणी मोहीमेत अनेक ग्राहक वीज चोरी करताना पकडले गेले, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. ही धडक कारवाई कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यामध्ये उपकार्यकारी अभियंता पंचबुद्धे, सहाय्यक अभियंते आशिष कुंभारे, सुंदराणी, कुलकर्णी, जयदीप पाटील, तंत्रज्ञ नदीम काजी तसेच इतर जनमित्रांचा सहभाग होता. मोहिमेत टीमने शहरातील वीज ग्रिडसह विविध भागांत फेरफटका मारत ग्राहकांची तपासणी केली. यात अनधिकृत वीज वापराचे अनेक प्रकरणे उघडकीस आली.

तपासणीत वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या अनधिकृत वापरानुसार दंड आकारला जाणार आहे. संबंधितांनी दंड न भरल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वीजचोरीमुळे प्रमाणिक ग्राहकांवर बोझा

वीज चोरीमुळे फक्त कंपनीच्या आर्थिक नुकसानाचे प्रमाण वाढत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडतो. वीज पुरवठा अस्थिर होतो, ट्रान्सफॉर्मर्सवर ताण येतो आणि संपूर्ण शहरातील वीज सेवा प्रभावित होते. त्यामुळे अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालणे महावितरणसाठी अत्यंत आवश्यक आहे. महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार, ही तपासणी मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment