होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Nagpur SBL Company Blast: राऊळगावच्या भीषण स्फोटतील मृतांचा आकडा वाढला; घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

On: March 1, 2026 2:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Nagpur SBL Company Blast News : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे रविवार, 1 मार्च 2026  रोजी सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. ही कंपनी बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवते. दरम्यान, या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला असून स्फोटत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर मृत कामगारांचे पार्थिव शविविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी संवेदना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने पोहोचले आहेत. सोबतच एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके हे देखील पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राऊळगाव येथील स्फोटानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत, स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment