होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राष्ट्रीय विज्ञान दिन ! लहान-लहान गोष्टीतून विद्यार्थ्यांनी उलगडले विज्ञानाचे रहस्य

On: February 28, 2026 3:57 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News:  शहरातील मेहरुण परिसरातील लिटील चाम्प प्रि. प्रायमरि स्कूल, जय दुर्गा प्राथमिक माध्यमिक व कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित एका पेक्षा एक सरस असे उत्तम प्रकल्प (प्रयोग) सादर केले. विद्यार्थ्यांचे हे प्रकल्प त्यांची वैज्ञानिकदृष्टी सादर करणारे ठरले. विद्यार्थ्यांनी लहान-लहान गोष्टीतून विज्ञानाचे रहस्य उलगडले.     

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नोबल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन इनरव्हील क्लब न्यू जेनच्या अध्यक्षा मास्टर मुनिरा, सचिव मिसेस इशिता दोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक सागर कोल्हे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक दीपक तळले, विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता लोखंडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे प्रकल्प ठरले लक्ष वेधी

प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रकाश किरणांचे परिवर्तन अपवर्तन, अपस्करण या घटनांचा परिणाम व निसर्गातील विविध घटनांचे विविध छोट्या प्रकिया आपल्या विज्ञान प्रकल्पातून सादर करत त्याचे स्पष्टीकरण केले. तसेच यावेळी विद्यालयातील रोहित पाटील, डिंपल वंजारे, गुंजन हटकर, समर्थ ठाकरे, मीनाक्षी इंगळे, जयश्री जाधव, कोमल निकम, धीरज चव्हाण, भावेश पोतदार, अश्विनी चौधरी, दीक्षा वाघ आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला.

प्रसंगी विद्यालयातील विज्ञान शिक्षिका नलिनी नेटके व सविता लोखंडे यांनी सी.व्ही. रामण यांचे वैज्ञानिक संशोधन कार्याविषयी तसेच विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रयोगांची माहिती दिली. तसेच दैनंदिन जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे आवाहन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.

दरम्यान, न्यू इनरविल क्लब जळगावतर्फे मास्टर मुनिरा आणि मिसेस इशिता दोशी यांच्यातर्फे विद्यालयाला मायक्रोस्कोप भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल आहिरे व अश्विनी चौधरी हिने तर आभार सविता लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment