होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आता शेतकऱ्यांना ‘या’ उद्योगासाठी मिळणार मोठी आर्थिक मदत, अर्ज कुठे व कसा करायचा?

On: January 24, 2026 5:29 AM
Follow Us:
---Advertisement---

National Edible Oil Mission : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत आता शेतकऱ्यांना तेलबिया प्रक्रिया उद्योगासाठी ३३ टक्के वा जास्तीत जास्त ९.९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली विविध मंजुरीपत्रे काय आहेत? अर्ज कुठे व कसा करायचा? हे जाणून घेऊयात.

कुणाला घेता येणार लाभ ?

ही योजना शेतकरी, शेतकरी गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी सह लघु व मध्यम उद्योगांसाठी लागू आहे. वैयक्तिक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी ओळखपत्र, आधार, जमिनीची माहिती, बैंक खाते, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, तसेच स्थानिक मंजुरीपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे व कसा करायचा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कृषी विभागामार्फत अर्ज करावा. अर्जासोबत प्रकल्प अहवाल, यंत्रसामग्रीचे कोटेशन, जमीन संबंधित कागदपत्रे तसेच आवश्यक मंजुरीपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. लघु व मध्यम तेल प्रक्रिया प्लांट उभारणी, तेलघाणा, पॅकिंग आणि साठवणूक व्यवस्थेसाठी या योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment