होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Paldhi Accident : भरधाव वाहनाने घेतला एकाचा नाहक बळी, तीन गंभीर

On: February 11, 2026 6:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Paldhi Accident : भरधाव वेगात असलेल्या एका अनियंत्रित वाहनाने दिलेल्या धडकेत उत्तम परदेशी (५४) यांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार, दि. ११ रोजी दुपारी जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पाळधी (ता. जामनेर) जवळ घडली. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत उत्तम परदेशी (५४) यांच्यासह काही तरुण रस्त्याने जात असताना, त्यांना भरधाव वेगात असलेल्या एका अनियंत्रित वाहनाने धडक दिली. या अपघातात उत्तम परदेशी (५४) यांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

संतप्त नागरिकांचा रास्तारोको

दरम्यान, संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्तारोको आंदोलन केल्याने काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी नागरिकांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा, अशी भूमिका घेतली होती.

ग्रामस्थांची तक्रार; प्रशासनाचे दुर्लक्ष

या परिसरात लहान-मोठे अपघात होत असतात. महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणाबाबत व शास्त्रोक्त पद्धतीने त्वरित गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसवण्याची मागणी अनेकवेळा केली. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना केलेली नाही, असा आरोपही नागरिकांनी केला.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment