होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

E-Peek Pahani : शेतकऱ्यांनो, आता उरले शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या काय का महत्त्वाची आहे पीक पाहणी ?

On: January 22, 2026 7:24 AM
Follow Us:
---Advertisement---

E-Peek Pahani : रब्बी हंगाम २०२५ ची ‘ई-पीक पाहणी’ करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातात आता केवळ ३ दिवस शिल्लक आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप आपल्या पिकांची ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणीची वाट न पाहता आजच ही प्रक्रिया पूर्ण करावी. आपला हक्क सुरक्षित करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे संबंधित विभागाने म्हटले आहे.

पीक पाहणी का महत्त्वाची ?

बँकेकडून कर्ज घेताना पीक पाहणीचा अहवाल आवश्यक असतो. नैसर्गिक आपत्तीः मदत पिकांचे नुकसान झाल्यास शासकीय मदत मिळवण्यासाठी याची नोंद अनिवार्य आहे. धान्य विक्री : सरकारी खरेदी केंद्रावर धान्य विकण्यासाठी सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.

तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. जर शेतकऱ्यांनी वेळेत पीक पाहणी पूर्ण केली नाही, तर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पीक विम्याचे संरक्षण मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते.

ई-पीक पाहणी कशी करावी?

  • ई-पीक पाहणी अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
  • ओपन पर्यायावर क्लिक करा.
  • महसूल विभाग निवडा.
  • खातेदार नोंदणी करून त्यात विचारलेली माहिती भरा.
  • पीक माहिती नोंदवा.
  • पिकाचा हंगाम आणि पिकाचा वर्ग निवडा.
  • जमीनीचे क्षेत्राबद्दल माहिती भरा.
  • जल सिंचनाचे साधन निवडा.
  • पिकाची सिंचन पद्धत लागवडीची तारीख निवडा.
  • पिकाचा फोटो काढून अपलोड करा.
  • सबमीट पर्यायावर क्लिक करा.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment