होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

HH Sundar Chaitanya Goswami Maharaj : ”हरे कृष्णा, हरे रामा”च्या गजरात जळगावात पदयात्रा

On: February 2, 2026 7:39 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : येथील ईस्कॉन मंदिरतर्फे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु यांच्या वैष्णव परंपरेनुसार “आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, (ईस्कॉन)”, ही विश्वव्यापी संस्था श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार जगभर करीत आहे. त्याचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे सन्यासी प्रचारक प.पु. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज, मॉरिशस यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील नेहरू चौकापासून पदयात्रेस सुरूवात झाली.

या पदयात्रेत प्रवचन व दिव्य हरिनाम संकिर्तनाचा जयघोष करण्यात आला. सदर हरिनाम संकिर्तन पदयात्रेचे आयोजन दि.२ रोजी दुपारी २ संध्या. ६. वा. दरम्यान करण्यात आले होते. या पदयात्रेस बिग बाजार नेहरू चौक, जळगांव येथुन प्रारंभ होऊन पुढे नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, गणेश कॉलनी, मानराज पार्क, गुजराल पेट्रोल पंप, पिंप्राळा बाजार पट्टा व पुढे हरे कृष्ण मंदिर, मयुर कॉलनी पिंप्राळा येथे सांगता करण्यात आली.

या ठिकाणी प.पु. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज, मॉरिशस यांचे प्रवचन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या पदयात्रेत भक्त “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राचे गायन करीत होते. एका बैलगाडीवर भगवंतांचे विग्रह मूर्ती सजविलेली होती. तसेच दि.३ व दि.४ रोजी संध्या. ६ ते ९ वाजे दरम्यान महासत्संगाचे आयोजन ” पोलीस पद्मालय हॉल”, पोलीस मुख्यालयाजवळ, नविन बस स्टॅण्ड रोड, स्टेडिअम शेजारी जळगांव येथे करण्यात आले आहे.

यामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे सन्यासी प्रचारक व कीर्तन सम्राट प.पु. लोकनाथ स्वामी महाराज, पंढरपूर यांचे कृपापात्र शिष्य प.पु. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज, मॉरिशस हे भगवद्गीता व श्रीमद्भागवत यातील विषयांवर तरूणांना व इतर उपस्थित सर्व भाविकांना विशेष प्रवचन देतील. हरे कृष्ण महोत्सवामध्ये श्रीकृष्ण कथा, कीर्तन, ५६ भोग, भगवंतांचा अभिषेक, आरती, झुला दर्शन ई. विशेष आकर्षण राहणार आहे.

महाराज दिव्य हरिनाम संकिर्तना करीता विश्वभरात प्रसिध्दp असुन येथे देखील भक्तांसोबत मधुर हरिनाम संकिर्तन झाले. प्रवचनानंतर रात्री सर्व उपस्थित भक्तांकरीता श्रीकृष्ण महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी, जास्तीत जास्त भाविकांनी या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment