T20 World Cup 2026 : आयसीसीने ‘खेळावंच लागेल अन्यथा कारवाईला सामोरे लावे लागेल’ असा इशारा दिल्यानंतर अखेर पाकिस्तानने 2026च्या टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार बाबर आझमलाही संघात संधी देण्यात आली आहे.
सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पहिला 2026च्या टी-20 विश्वचषक सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळणार असून, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे.
पाकिस्तान संघ
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन आफ्रिदी, शादाब खान, उस्मान तारिक खान आणि उस्मान खान.










