नशिराबाद : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पंकज महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज (दि. १३ जानेवारी) नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरध्वनीवरून निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
नशिराबाद नगर परिषदेची नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज (दि. १३ जानेवारी) नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षपदी पंकज महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या पदासाठी महाजन यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध जाहीर करण्यात आले, तर भारतीय जनता पक्षातर्फे स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक व शिवसेना शिंदे गटातर्फे एक असे दोन नावे जिल्हाधिकारींकडे पाठवण्यात आली होती. त्याला मंजुरी मिळाल्याने प्रदीप (बापू) लक्ष्मण बोडरे व संदीप (आबा) विष्णू पाटील यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जाहीर करण्यात आली.
निवड झालेल्या सर्वांचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरध्वनीवरूनअभिनंदन केले. नगरपरिषदेच्या भारतीय जनता पार्टी गटनेत्या लालचंद पाटील व शिवसेना शिंदे गटाचे गटनेता शैला व्यवहारेव नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
सभेच्या सुरुवातीलाच सर्व नगरसेवकांचा नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी सत्कार केला. यावेळी सर्व पक्षाचे नगरसेवकांसह सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.









