JMC Election Results Live Update : जळगाव महानगरपालिका निवडणूक निकालाची सुरूवात झाली असून, त्याची प्रत्येक अपडेट आपल्याला येथे वाचायला मिळेल. काही वेळाने ही लिंक रिफ्रेश करत रहा.
प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी झाला असून, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार फरदीन खान यांचा पराभव झाला आहे.
फेर मतमोजणीची मागणी
प्रभाग क्रमांक 8 आणि 10 मध्ये माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अर्जाद्वारे फेर मतमोजणीची मागणी केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उघडले पहिले खाते
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिले खाते उघडले आहे. अर्थात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव प्रफुल देवकर प्रभाग क्रमांक 13 ‘अ’मधून विजयी झाले आहेत.
शिंदेसेनेचे तीन उमेदवार विजयी
शिंदेसेनेचे प्रभाग क्रमांक 18 ‘ब’ मधून नलुबाई तुळशीदास सोनवणे, “क” मधून अनिता सुरेश भापसे, तर प्रभाग क्रमांक 19 मधून निकिता वंजारी विजयी झाल्या आहेत.
भाजपची मुसंडी
प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे पाटील विजयी झाले असून, आतापर्यंत भाजप 10, शिवसेना शिंदे गट 7 आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने 1 विजयी मिळवला आहे.
ललित कोल्हे विजयी
प्रभाग क्रमांक 4 ‘ब’ विद्या मुकुंदा सोनवणे विजयी. प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर तिघे उमेदवार विजयी.
प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेसेनेचे ललित विजय कोल्हे, सिंधूताई विजय कोल्हे, डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, संतोष मोतीराम पाटील चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री राहुल पाटील विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 15 : महायुतीचे सर्व उमदेवार विजयी
प्रभाग क्रमांक 15 मधील महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून यामध्ये अरविंद देशमुख , चेतन शिरसाळे , काळे रेशमा कुंदन (शिवसेना) प्रकाश रावलमल बालानी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपच्या उमेदवार रंजना वानखेडे विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या उमेदवार प्रतीक्षा कैलास सोनवणे विजयी, तर अपक्ष उमेदवार चैताली ठाकरे पराभूत झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ८ ‘अ’ मधून भाजपच्या कविता पाटील विजयी झाल्या आहेत.









