PM Narendra Modi : स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर होता, परंतु काँग्रेसने देशाला 10व्या क्रमांकावर नेले. मात्र, आज देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचत आहे. काँग्रेसची प्रतिमा जी होती, ती पुसून टाकण्यासाठी मला अनेक वर्ष लागली. त्यांच्या पंतप्रधानांची जुनी भाषणे ऐका. त्यांच्याकडे ना विचार, ना दृष्टी, ना इच्छाशक्ती होती, अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज माझा देश आपली पूर्ण क्षमता दाखवत आहे. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक ताकद असते, तुमच्या नागरिकांचा देशाबद्दलचा उत्साह असतो आणि विशेषतः उत्पादनासाठी एक मजबूत परिसंस्था असते तेव्हाच जग तुमच्याशी व्यवहार करण्यासाठी पुढे येते. मतांच्या राजकारणात बुडलेल्यांनी देशाच्या या अनेक पैलूंना बळकटी देण्याला कधीही प्राधान्य दिलेले नाही.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “इंदिरा गांधी ज्या नियोजन आयोगाचे तुकडे करत होत्या, तो त्यांच्या वडिलांनी (जवाहरलाल नेहरू) स्थापन केला होता. 2014 पर्यंत सर्वजण नियोजन आयोगाकडे पाहत होते, पण त्यात सुधारणा करण्याबद्दल कोणीही बोलत नव्हते. 2014 मध्ये जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही येऊन काम केले, नियोजन आयोग रद्द केला आणि नीती आयोगाची स्थापना केली.”
काँग्रेसने शेतकऱ्यांना बाजूला केले – पीएम मोदी
“या देशात १० कोटी शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, परंतु त्यांचा कधीही विचार केला गेला नाही. तसेच त्यांना (काँग्रेसला) लहान शेतकऱ्यांबद्दल कोणताही विचार नव्हता. त्यांना वाटले की जर त्यांनी मोठ्या लोकांना सोबत घेतले तर गोष्टी व्यवस्थित होतील.”, अशी टीकाही पीएम मोदींनी केली.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)








