PSI Sanjay Shelar : जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार यांना २०२६ चे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. भारत सरकारकडून त्यांना २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
पीएसआय संजय शेलार यांनी पोलीस दलात ३५ वर्षे सेवा पूर्ण केली आहे. या काळात त्यांना तब्बल २४२ बक्षीसे मिळाली आहेत. विशेषतः संपूर्ण सेवा काळात त्यांना एकही शिक्षा, दंड किंवा ताकीद देण्यात आलेली नाही. ३५ वर्षांच्या सेवेत ते कधीही आजारी रजेवर गेलेले नाहीत.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.








