KDMC News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे यांच्या पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी दावा केला की हा राज ठाकरेंचा नव्हे तर त्यांच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की , “स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे त्यावर राज ठाकरे खूप नाराज आहेत. जर कोणी सत्तेसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांसोबत गेले तर लोक त्यांनाही बेईमान म्हणतील. ही तिथल्या लोकांनी केलेली मोठी चूक आहे.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे ?
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, मनसे शिंदे सेनेला पाठिंबा देतेय. विकासासाठी जो कोणी सामील होईल त्यालाही सामील केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुमतासाठी किती जागा आवश्यक
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर निवडण्यासाठी ६२ नगरसेवक आवश्यक आहेत. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५३ नगरसेवक, तर भाजपकडे ५० नगरसेवक आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गट ठाकरे गटातील दोन नगरसेवकांना सत्तेत आणण्याची चर्चा सुरु आहे.











