होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेप्रति जबाबदारीने वागणे हेच गाडगे बाबांना कृतिशील अभिवादन – महापौर

On: February 23, 2026 3:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Sant Gadge Baba Jayanti : संत गाडगे बाबांनी त्यांच्या आयुष्यात स्वच्छतेला सर्वोच्च महत्त्व दिले. आपले शहर स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेप्रति जबाबदारीने वागणे हेच गाडगे महाराजांना कृतिशील अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले.

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी संत गाडगे महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक नागरिकाने जळगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

 

महानगरपालिकेत प्रतिमेचे पूजन

महानगरपालिका प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात महापौर दीपमाला काळे यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

गाडगेबाबा उद्यान व पालखी सोहळा

संत गाडगेबाबा उद्यानामध्ये महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या पालखीतील पुतळ्याचेही त्यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेता प्रकाश बालाणी, स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, कल्पेश सोनवणे यांच्यासह नगरसेवक आशा पाटील, वैशाली पाटील, माधुरी अतुल बारी, जयश्री राहुल पाटील, निलेश तायडे यांचेसह माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, महेश चौधरी, राजू मराठे, राहुल वाघ, अतुल बारी, राहुल पाटील, महेश पाटील, अरुण शिरसाळे आदी उपस्थित होते.

 

संभाजीनगर परिसरात अभिवादन

संभाजीनगर परिसरातील संत गाडगेबाबा चौकातही महापौरांनी भेट देऊन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजपचे उपगटनेता नितीन बरडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment