प्रतिनिधी । नशिराबाद : येथील शिंदेसेनेच्या गटनेतेपदी शैला व्यवहारे, तर उपघटनेतापदी चेतन बऱ्हाटे यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात नगरपालिकेच्या कारभारात शैला व्यवहारे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
गटनेतेपद का महत्वाचे?
नगरपालिकेत एखाद्या पक्षाचे सर्वाधिक वा प्रभावी नगरसेवक असतील, तर त्या पक्षाच्या नगरसेवकांचा प्रमुख म्हणून गटनेता निवडला जातो. गटनेता हा नगरपालिकेतील पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो. पक्षाच्या सर्व नगरसेवकांमध्ये समन्वय साधणे, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व इतर बैठकीत पक्षाची भूमिका मांडणे, विकासकामे, प्रस्ताव व ठरावांबाबत पक्षाची भूमिका निश्चित करणे, नगराध्यक्ष व प्रशासनाशी समन्वय ठेवणे, पक्षाच्या धोरणांनुसार नगरपालिकेचे निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणे, नगरसेवकांच्या अडचणी, प्रश्न वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या गटनेतेच्या असतात. गटनेतेपद हे केवळ मानाचे नसून अत्यंत जबाबदारीचे पद मानले जाते.
यांची होती उपस्थिती
शिवसेना शिंदेसेनेचे नगरसेवक पंकज महाजन, विकास पाटील, असलम तन्वीर सर ,चेतन बराटे, लीना महाजन, भारताबाई धनगर, कोमल नारखेडे, शाह हनीफा बी मोहम्मद खलील, मण्यार कमरूनिसा सय्यद बिस्मिल्ला, व सर्व नगरसेवक व सर्व शिवसैनिक शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.









