होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sharad Pawar hospitalized : शरद पवारांची प्रकृती बिघडली, बारामतीहून पुण्याकडे रवाना

On: February 9, 2026 3:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Sharad Pawar hospitalized : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना थोड्याच वेळात पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या कार्यालयाने दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. आज मात्र, त्यांना जास्त त्रास होत असल्याने सकाळी (दि. ९ फेब्रुवारी ) डॉक्टरांची एक टीम त्यांच्या निवासस्थानी (बारामतीच्या गोविंदबाग) दाखल झाली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा डॉक्टरंच्या एका टीमने त्यांची तपासणी केली.

ताप, खोकला अन् कफ

शरद पवार यांना खोकला, ताप आणि कफचा त्रास जाणवत असल्याने सकाळी (दि. ९ फेब्रुवारी ) डॉक्टरांची एक टीम त्यांच्या निवासस्थानी (बारामतीच्या गोविंदबाग) दाखल झाली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा डॉक्टरंच्या एका टीमने त्यांची तपासणी केली.

दरम्यान, त्रास कमी होत नसल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे.

दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी

बारामतीच्या काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार यांच्यासह इतर कुटुंबीय उपस्थित राहणार होते. परंतु, शरद पवार यांना त्रास होत असल्याने सर्व कुटुंबीय पुण्याच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)  

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment