Varangaon News: रावेर लोकसभा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांचा वाढदिवस शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाभराततून जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
शनिवार १४ रोजी सकाळी ५ वाजता शेगावचे श्री गजानन महाराज आणि सिरसाळा मारुती मंदिर येथे हनुमंत रायाचे महाजन सर यांनी सपत्नीक दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. शिवसेना परिवाराकडून सकाळी १० वाजता वरणगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. दुपारी १२ वाजता गंगाधर सांडू चौधरी विद्यालयात शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला. सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १०.३० पर्यंत अभिष्टचिंतन कार्यक्रम सुरू होता.

व्यासपीठावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जेष्ठ शिवसैनिक विलास मुळे, मुक्ताईनगर तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, अल्पसंखांक विभागाचे जिल्हाप्रमुख हिप्पी शेठ, अल्लाउद्दीन शेठ, अफसर खान, सहकारमित्र चंद्रकांत बढे, बोदवडच्या नगराध्यक्ष मीराबाई माळी, माजी नगराध्यक्ष हाजी सईद बागवान, वरणगाव शिवसेनेचे नगरसेविका तृप्ता महाजन, माला मेढे, राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, जूमा खाटिक, अश्फाक शाह, मुक्ताईनगरचे नगरसेवक, सावद्याचे नगरसेवक, धर्मा महाजन यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला प्रास्ताविक भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी यांनी केले. नंतर समाधान महाजन सर यांचे कुटुंबातर्फे औक्षण करण्यात आले. उपस्थित मान्यवरापैकी नवनीत पाटील, अफसर खान, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत बढे भगवान पाटील, गणेश झोपे यांनी समाधान महाजन यांच्याबद्दल आपले मनोगते व्यक्त केली.
आमदार चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याबद्दल बोलताना, संघटन मजबूत करून जिल्हाप्रमुख यांनी वरणगाव येथे नगरपरिषदेत शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आणले. ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असे प्रतिपाजन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी नगरसेवक गणेश धनगर, विलास मुळे, रवी कोल्हे, संतोष माळी, गणेश झोपे, दुर्गेश बेदरकर, समाधान रेलकर, कमलेश येवले, सविता माळी, सुरेश चौधरी, सुभाष चौधरी, राजेंद्र चौधरी, संजय वंजारी, अशोक शर्मा, राम शेटे, नितीन देशमुख, सुखदेव धनगर, निलेश सुरडकर, प्रशांत पाटील, योगेश कोळी, अमोल कोळी, किरण माळी, कृष्णा पाटील, अक्षय सोनार, कृष्णा पूजारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी परिश्रम घेतलं. सूत्रसंचालन श्रद्धा देशमुख यांनी केले.








