होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Varangaon News: शिवसेनेचा कुऱ्हा-वाराडसिम गटात ‘शिवसंपर्क अभियान’

On: March 1, 2026 3:58 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: शिवसेनेतर्फे भुसावळ तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी कुऱ्हा-वाराडसिम या जिल्हा परिषद गटातील गावात दौरा करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत येत्या काळात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले. या शिवसंपर्क अभियान दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसापासून भुसावळ तालुक्यात शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. यापूर्वी तालुक्यातील फुलगाव, कठोरा, सावतर निंभोरा, आचेगाव, पिंपळगाव, सुसरी, तळवेल या ठिकाणी शिवसंपर्क दौरा झाला. दुसऱ्या टप्प्यात शनिवारी सायंकाळी कुऱ्हा वारडसिम या जिल्हा परिषद गटात शिव संपर्क अभियान दौरा करण्यात आला. यामध्ये भीलमडी, मांडवा डीघर, कुऱ्हा, वाराडसिम, गोजोरा, वांजोळा या ठिकाणी भेटी देऊन गावागावांतील समस्या ऐकून घेतल्या.

या शिवसंपर्क अभियान दौऱ्यात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, माजी पंचायत समिती सदस्य गणेश झोपे, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, शैलेश ठाकरे, उप तालुकाप्रमुख जितेंद्र नागपुरे, गजानन पालोदे, संदीप महाजन, भूषण बडगुजर, दिनेश काकडे, पिंटू उंबरकर, अशोक भोई, रवींद्र शिंदे, सागर धनगर, भिलमडीचे बोदराज पवार, नंदू राठोड, कैलास राठोड, मुलचंद जाधव, मांडवा दीघरचे निळकंठ पवार, शिवसेना शाखा प्रमुख राहुल पवार, गोर सेना उपजिल्हाध्यक्ष दिनेश पवार, कैलास जाधव, रवींद्र पवार, कृष्णा राठोड, नीरज पवार, दिलीप पवार, शैलेश ठाकरे, वराडसिमचे रामदास पाटील, समाधान बावस्कर, अजय पाटील, गोकुळ पवार वांजोळ्याचे कैलास पाटील, विलास पाटील, गौरव पाटील, जितेंद्र पाटील, संजू पाटील यांच्यासह नागरिक आणि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment