होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Faizpur Municipal Council : काँग्रेसच्या चार नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस, पक्षशिस्त भंगाचा आरोप

On: January 30, 2026 6:45 PM
Follow Us:
---Advertisement---

Faizpur Municipal Council : पक्षशिस्त भंगाप्रकरणी फैजपूर नगरपरिषदेतील काँग्रेसच्या चार नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाच्या बैठकीत ठरलेल्या नावाऐवजी दुसरे नाव सुचविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात असून, संबंधितांनी सात दिवसांत खुलासा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही  जिल्ह्याध्यक्षांनी दिला आहे.

प्रभाग क्र. 1 मधील हकीम एमत तडवी, प्रभाग क्र. 2 मधील सादेका बी शेख दानिश, प्रभाग क्र.7 मधील प्रियंका ईश्वर इंगळे आणि प्रभाग क्र. 8 मधील शेख इरफान शेख इक्बाल यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित नगरसेवकांनी सात दिवसांत लेखी उत्तर द्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा असा इशारा  जिल्ह्याध्यक्षांनी दिला असून, जिल्ह्यात पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, अशी तंबीही जिल्हाध्यक्ष पवार यांनी दिली आहे.

पक्षशिस्त भंगाचा आरोप

नामनिर्देशित सदस्याच्या शिफारसीसाठी झालेल्या पक्ष बैठकीत डॉ. शेख दानिश शेख निसार यांच्या नावावर एकमत झाले होते. मात्र, गटनेते शेख इरफान शेख इक्बाल यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन भाजपचे पवन अनिल सराफ यांचे नाव सुचविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment