होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

IND vs PAK : बांगलादेश एक पाऊल मागे सरकला; पाकिस्तानलाही केली विनंती

On: February 9, 2026 5:23 PM
Follow Us:
---Advertisement---
IND vs PAK : भारताविरुद्ध पाकिस्तान संघ मैदानात उतरेल की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तथापि, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांच्यात चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डदेखील समाविष्ट आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला एक विशेष विनंती केल्याची माहिती समोर आले आहे.

रिपोर्ट्सनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) चे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध २०२६ च्या टी२० विश्वचषक सामन्यावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली आहे. रविवारी लाहोरमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ही विनंती करण्यात आली, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा उपस्थित होते.

पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी

वृत्तानुसार, या सामन्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने आयसीसीसमोर तीन मागण्या ठेवल्या आहेत. पाकिस्तानने आयसीसीकडून जास्त महसूल वाटा मागितला आहे.

शिवाय, भारतासोबत द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी,  तसेच २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करावे, अशी मागणी केल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment