Maharashtra Weather : नववर्षाच्या प्रारंभी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामान सतत बदलत होत आहे. अशात पुन्हा पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
विशेषतः उत्तर महाराष्ट्र किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवू शकते. विभागाच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत घटण्याची शक्यता आहे.
जळगावच्या तापमानात घसरण
दरम्यान, रविवारी जळगावचे किमान तापमान १२.६ अंश तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस इतके होते. सोमवारी यात घसरण होऊन रात्रीचे किमान तापमान ११. ८ अंश तर दिवसाचा पारा २८.४ अंश इतके होते.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत, तर सायंकाळी आणि सकाळी गारठा निर्माण होत आहे. अशात पुन्हा पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.










