होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतात गेले अन् परतलेच नाही; घटनेनं दळवेल गावात हळहळ…

On: January 19, 2026 2:12 PM
Follow Us:
---Advertisement---

पारोळा : तालुक्यातील दळवेल येथील बाळू कौतिक पाटील (वय ५८) हे शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना रविवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू पाटील हे सकाळी सुमारे पाच वाजता शेतात गेले होते. मात्र सकाळी आठ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, शेतातील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना खासगी वाहनाने पारोळा येथील कुंटीर रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment