होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News : हिंदू जनजागृती समितीची रविवारी जळगावात सभा

On: January 30, 2026 9:53 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६ ) सायंकाळी ५ वाजता मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’ होणार आहे, अशी माहिती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी पद्मालय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत दिली.

प्रमुख वक्ते लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा असून, सनातन संस्थेच्या स्वाती खाडये, हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदू जनजगृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर हे सभेला संबोधित करणार आहेत. सभेत उपस्थित नागरिक एकत्रितपणे संपूर्ण वंदे मातरम गाणार आहेत.

रॅलीचे आयोजन

सभास्थळी ग्रंथ प्रदर्शन आहे. यावर्षी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असणार आहे. १ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता, उ‌द्घाटन होणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत प्रदर्शन पाहता येईल. सभेची प्रचार वाहन फेरी दि. ३१ जानेवारीला सकाळी १० वाजता नेहरू चौकातून निघेल.

छत्रपती शिवराय स्मारक चौक, पिंप्राळा येथे समारोप होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, सकल हिंदू समाजाचे राकेश लोहार, समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment