होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Iranian Woman : अखेर ‘त्या’ इराणी महिलेची भारतातून होणार हकालपट्टी

On: February 3, 2026 11:05 AM
Follow Us:
---Advertisement---

Iranian Woman : जळगावच्या धरणगावात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या फरनाज हमीद रेझा (३८) हिची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. तिला गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी) जळगावातून दिल्लीला नेण्यात येणार असून, दि. ६ रोजी विमानाने इराणमध्ये पाठविण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धरणगावातील कुरेशी मोहल्ल्यात एक वर्षापासून इराणी महिला मुलासह वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जळगावातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली. इराण दूतावासाने महिलेला परत बोलविण्याविषयी सकारत्मकता दर्शविली.

त्यानुसार आता या महिलेची ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला रवानगी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ५ फेब्रुवारी रोजी तिला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळगावातून दिल्लीला घेऊन जाणार आहे.

मायदेशी पाठविण्याचा निर्णय

सदर महिलेला इराणमध्ये पाठविण्यासाठी जळगाव पोलिस दलाने तयारी सुरू केली. मात्र सदर महिलेला केवळ फारसी व थोडीफार इंग्रजी भाषा येत असल्याने माहिती घेताना पोलिसांना अडचण येत होती. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकाऱ्यांनी ट्रान्सलेटरचा आधार घेत सदर महिलेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर तिला परत पाठविण्यासाठी इराण दूतावासाशी संपर्क साधून माहिती दिली.

Iranian Woman Story : ती गर्भवती अन् पतीचा खून; इराणी महिला धरणगावात कशी आली?

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment