होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मोठी बातमी! ‘या’ तारखेला होणार महापौर आरक्षण सोडत

On: January 19, 2026 9:01 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महापालिका सार्वत्रिक निवडणुकींच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहे. दरम्यान, या आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवारी (दि. २२ जानेवारी ) मुंबईतील मंत्रालयात काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगर विकास विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

नगर विकास विभागाने म्हटले आहे की, ही प्रक्रिया मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात गुरुवारी (दि. २२ जानेवारी ) सकाळी ११ वाजता पार पडेल. यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह इतर वरिष्ठ सनदी अधिकारी,   राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या उपस्थित चिठ्ठ्या टाकून ही सोडत काढली जाणार आहे.

कोणत्या प्रवर्गांसाठी निश्चित होणार ‘आरक्षण’

  • अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जाती महिला
  • अनुसूचित जमाती (ST) आणि अनुसूचित जमाती महिला
  • इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि ओबीसी महिला
  • सर्वसाधारण महिला (General Women)
  • खुला प्रवर्ग (Open)

जळगावात आरक्षणापूर्वीच ‘ही’ नावे चर्चेत

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहे; पण जळगावात आरक्षणापूर्वीच इच्छुकांची नावे चर्चेत आली आहे. महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आलेले डॉ. विश्वनाथ खडके यांच्यसह उज्ज्वला बेंडाळे, शुचिता हाडा, दीपमाला काळे, नितीन बरडे, सुनील वामनराव खडके, राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीत भाजपकडून आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे महापौरपदासाठीही इच्छुकांमध्ये रस्सीखेच होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment