होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

JMC News : महापौर, उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग, निवडीचा कार्यक्रम जाहीर!

On: January 24, 2026 6:14 AM
Follow Us:
---Advertisement---

JMC News : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे. अर्थात २७ वा २८ जानेवारी रोजी या पदाचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. ३० वा ३१ जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक घेऊन मतदानाद्वारे महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेतील नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर निवडीसाठीचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २२ जानेवारी २०२६ रोजी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, ३० व ३१ जानेवारी २०२६ रोजी महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. यापैकी नेमकी कोणत्या दिवशी निवड होणार आणि पीठासीन अधिकारी कोण असणार हे विभागीय आयुक्त ठरविणार आहेत.

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पाठविलेल्या पत्रानुसार, आता विभागीय आयुक्त लवकरच विशेष सभेची तारीख आणि वेळ निश्चित करतील. याच सभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडेल. तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) स्वीकारण्याची तारीखही लवकरच घोषित केली जाणार आहे. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, आरक्षणाने अनेकांची समीकरणे बदलली आहेत.

महापौरपद ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, जळगाव महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यानुसार, आगामी अडीच वर्षांच्या पहिल्या सत्रासाठी महापौरपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ या गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रवर्गातील कोणत्या नगरसेविकेला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment