होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

High Blood Pressure : उच्च रक्तदाबाच्या समस्येवर रामबाण ठरतात ‘हे’ घरगुती उपाय

On: February 9, 2026 12:28 PM
Follow Us:
---Advertisement---

High Blood Pressure Remedy : हल्ली धावपळ आणि तणावपुर्ण जिवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यात यात रक्तदाबाची समस्या अनेकांना उद्भवते. काहींना कमी रक्तदाब तर काहींना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तदाबासंदर्भातील या दोन्ही समस्या जीवघेण्या देखील ठरु शकतात. अशात तुम्ही देखील उच्च रक्तदावाच्या समस्येने ग्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. या लेखात आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होऊ शकेत. चला तर मग, जाणून घेऊया काय आहेत ते घरगुती उपाय.

 वजन कमी करा

वाढते वजन हे रक्तदाबाची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. जास्त वजनामुळे स्लीप एपनियासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्यामुळे रक्तदाब आणखी वाढतो. त्यामुळे वाढते वजन नियंत्रित केले पाहीजे. विशेषतः पोटाभोवती निर्माण होणारी चरबी उच्च रक्तदाबाचा धोका वाढवते, म्हणून पोटाची चरबी वाढणार नाही याकडे लक्ष दिले पाहीजे.

नियमित व्यायाम करा

निरोगी आयुष्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर दररोज तीस मिनिटे हलका व्यायाम करावा, जसे की वेगाने चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा नृत्य करणे याद्वारे तुम्ही रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी करू शकते. नियमित शारीरिक हालचाली केवळ उच्च रक्तदाब कमी करत नाहीत तर तो पुन्हा वाढण्यापासून देखील रोखतो.

सकस आहार घ्या

उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी धान्य, फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारत समावेश करा. तसेच केळी, पालक आणि मसूर यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ मिठाचे परिणाम कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत करतात.

मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा

मिठाचे अतिसेवन उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. तसेच पॅक केलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते, त्यामुळे असे पदार्थांचे सेवन टाळा. स्वयंपाक करताना मीठाचे सेवन मर्यादित करा आणि चवीसाठी मसाल्यांचा वापर करा.

व्यवस्थित आणि पुर्णवेळ झोप

सुदृढ आरोग्यासाठी झोप महत्त्वाची आहे. तुम्ही सतत कमी झोप आणि जास्त ताण घेत असाल तर हे देखील उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे दररोज ७ ते ८ तास झोप घ्या आणि ताणतणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा सराव करा.

मद्यपान आणि सिगारेट सोडा

मद्यपान आणि धुम्रपान हे उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरतात. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येवू शकतो. त्यामुळे ही व्यसने त्वरीत सोडावी.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)  

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment