High Blood Pressure Warning Signs In Morning: हल्ली धावपळीच्या या युगात उच्च रक्तदाबाची समस्या अनेकांना उद्भवत आहे. ही एक सामान्य समस्या वाटत असली तरी ती अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. बरेच लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परंतु, याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू सकते. अनियंत्रित रक्तदाबामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मृत्यू देखील होऊ शकतो. अशात, उच्च रक्तदाबाच्या समस्येपुर्वी शरीर सकाळच्या वेळेत काही महत्त्वाचे संकेत देते. हे संकेत लक्षात घेत वेळीच वैद्यकीय चाचणी केल्याने मोठा धोका टाळता येतो. चला, तर मग, जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत.
उच्च रक्तदाबाच्या समस्येपुर्वी सकाळी शरीर देते ‘हे’ संकेत
उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्यापुर्वी शरीर काही संकेत देते. प्रामुख्याने सकाळच्या वेळी मिळणारे हे संकेत तुम्हाला रक्तदाब वाढल्याची जाणीव करुन देवू शकतात. उच्च रक्तदाब दर्शविणाऱ्या काही सकाळच्या लक्षणांबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण लोक अनेकदा ही लक्षणे अनुभवतात, परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात.
डोकेदुखी – तुम्हाला सकाळी उठल्यावर डोक्यात जडपणा किंवा तीक्ष्ण वेदना जाणवत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. जर ही समस्या वारंवार निर्माण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
थकवा आणि सुस्ती – बऱ्याचदा जास्त हालचाल न करताही अशक्तपणा, आळस किंवा उर्जेचा अभाव जाणवणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे जाणवत असेल तर वेळेवर आणि योग्य उपचार घेणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरु शकते.
चक्कर येणे – अचानक चक्कर हे देखील उच्च रक्तदाब दर्शवू शकते. जर सकाळी असे घडले, तर चाचणी करुन घेणे फायद्याचे ठरते.
धूसर दृष्टी – सकाळी उठल्या उठल्या तुम्हा डोळ्यासमोर आंधारे येत असेल किंवा धूसर दृष्टी जाणवत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. हे उच्च रक्तदाबाचे संकेत असू शकते. अशा परिस्थितीत, ताबडतोब तपासणी करत वैद्यकीय सल्ला घ्यावा.
श्वास घेण्यास त्रास – हलके काम करून किंवा चालताना श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत जडपणा जाणवणे ही समस्या तुम्हाला जाणवेत असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते. अशा परिस्थितीत वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.
असा करा रक्तदाब नियंत्रित
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहारात सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानुसार, आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा जाणून घेऊया.
-उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सफरचंद आणि केळीसारख्या फळांचे सेवन करावे.
-दही अनेक पोषकतत्वांनी परिपुर्ण आहे. दहीचे नियमित सेवन देखील उच्च रक्तदाबाच्या समस्येत फायदेशीर ठरते.
-मीठाचे सेवन कमी करणे देखील एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण जास्त मीठ रक्तदाब वेगाने वाढवू शकते.
-पालक आणि बीटमधील पोषक तत्वे देखील रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत करू शकतात.
(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)











