होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Varangaon BJP News : वरणगावात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

On: February 11, 2026 2:59 PM
Follow Us:
---Advertisement---

वरणगाव : जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी) येथील भाजपच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    

भारतीय जनता पक्षाचे वैचारिक आधारस्तंभ आणि भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय (२५ सप्टेंबर १९१६ – ११ फेब्रुवारी १९६८) यांनी ‘एकात्म मानवतावाद’ आणि ‘अंत्योदय’ (समाजातील शेवटच्या घटकाचा विकास) ही विचारसरणी मांडली.

त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जनसंघाला भक्कम आधार मिळाला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, ११ फेब्रुवारी हा दिवस भाजपातर्फे दरवर्षी “समर्पण दिवस” म्हणून पाळला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, वरणगाव उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे, नगरसेविका शामल झांबरे, वृषाली चौधरी, बांधकाम सभापती श्रद्धा गायकवाड, सार्वजनिक स्वच्छता सभापती भाग्यश्री सोनवणे, पाणीपुरवठा सभापती निलेश खाचणे, शहराध्यक्ष पप्पू माळी, माजी सरपंच सुभाष धनगर, महेश सोनवणे, इफ्तिकार मिर्जा, बापू महाजन आदी उपस्थित होते.

(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment