होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक! शाळेत निघालेल्या दोन मुलींची हत्या, भुसावळच्या साकरी गावातील घटना

On: January 27, 2026 11:51 AM
Follow Us:
---Advertisement---

Sakari Murder Case : शाळेत निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींची एका अज्ञात इसमाने विहिरीत ढकलून निर्घृण हत्या केली. ही घटना भुसावळच्या साकरी गावात आज मंगळवारी (दि. २७ जानेवारी) उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत दोन्ही मुली गावातील एका शाळेत शिक्षण घेत होत्या. आज मंगळवारी (दि. २७ जानेवारी) सकाळी त्या शाळेत निघाल्या असता एका अज्ञात इसमाने विहिरीत ढकलून देत दोन्ही मुलींची निर्घृण हत्या केली.

घटनेची माहिती मिळतात गावातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. दरम्यन, संतप्त ग्रामस्थांनी संशयित नरेंद्र चौधरी याच्यावर आरोप करत त्याला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

भुसावळ तालुका पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. यावेळी काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, गावात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त  तैनात  केला  आहे. या प्रकरणी प्रकरणी संशयिताची सखोल चौकशी सुरू असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कारण गुलदस्त्यात

घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपअधीक्षक नितीन गणापुरे, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, एका अज्ञात इसमाने कुठल्यातरी कारणातून या मुलींना विहिरीत ढकलून दिल्याचा पोलिसांना संशय असून, पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment