JMC Election Update : जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15 जानेवारी) सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 13.39 टक्के, दुपारी 1.30 वाजेपर्यंत 22.49 टक्के, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 34.27 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
यांनी बजावला मतदानाचा हक्क
आमदार सुरेश भोळे यांनी सपरिवार प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथे आपले मत नोंदवले. यावेळी माजी महापौर सीमा भोळे, महायुतीकडून बिनविरोध निश्चित झालेले उमेदवार विशाल भोळे आणि कुटुंबातील सदस्य आदी उपस्थित होते.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सपत्नी मतदानाचे हक्क बजावले. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सपरिवार सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माजी आमदार लता सोनवणे, प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक गौरव चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.









