होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

T20 World Cup 2026 : टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? जाणून घ्या…

On: February 8, 2026 1:11 PM
Follow Us:
---Advertisement---

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने 2026 च्या टी-20 विश्वचषकाची शानदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट चमकली, त्याने 49 चेंडूत 84 धावा केल्या. सूर्याच्या नाबाद 84 धावांच्या या खेळीच्या जोरावर भारताने 161 धावांपर्यंत मजल मारली. यूएसएला 162 धावांचा पाठलाग करताना 132 पर्यंतच पोहचता आले. भारताने यासह यूएसएला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले. आता टीम इंडियाचा पुढचा कधी, कुठे आणि कोणत्या संघाविरुद्ध आहे, जाणून घेऊया.

गट टप्प्यात, सर्व संघ त्यांच्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळणार आहे. अर्थात प्रत्येक संघ गट टप्प्यात चार सामने खेळेल. भारताचा पुढील सामना गुरुवारी (दि.12 फेब्रुवारी) आहे.

कोणत्या संघाविरुद्ध ?

गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया संघ आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना गुरुवारी (दि.12 फेब्रुवारी) नामिबियाविरुद्ध आहे.

सामना कुठे होईल?

नामिबिया त्यांचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळेल. भारत विरुद्ध नामिबिया सामना चालू आवृत्तीत दोन्ही संघांसाठी दुसरा सामना असेल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

नामिबिया संघ : निकोल लॉफ्टी, जॅन फ्रायनलिंक, जेजे स्मित, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), बर्नार्ड शॉल्ट्झ, मालन क्रुगर, झेन ग्रीन (यष्टीरक्षक), रुबेन ट्रम्पेलमन, लॉरेन स्टीनकॅम्प, बेन शिकोंगो, झेन बोल्ट, डायलन ब्रेचर, विल्यम ब्रेचर, मॅक्स जॅकेर्स.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment