होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Health Tips : तुमच्या घरातही लहान मुलं, पाळीव प्राणी आहेत? मग ही झाडे लावू नका; अन्यथा…

On: January 31, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Health Tips : घरात रोपे आणि झाडे लावणे केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर घरातील वातावरण ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते. मात्र, काही झाडं दिसायला सुंदर असली तरी लहान मुले आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. परिणामी चुकीच्या निवडीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ही झाडे नेमकी कोणती आहेत? जाणून घेऊया.

घरात लावू नका ही धोकादायक झाडे

कॅक्टीस (नागफणी) : कॅक्टीसच्या काट्यांमुळे लहान मुले व पाळीव प्राणी जखमी होऊ शकतात. विशेषतः बाल्कनीमध्ये ठेवलेले छोटे कॅक्टीस अपघातास कारणीभूत ठरू शकतात.

चेरी लॉरेल : दिसायला सुंदर असले तरी हे झाड अत्यंत विश्वरी आहे. याची फुले वा पाने प्राण्यांनी खाल्ल्यास श्वास घेण्यास त्रास होऊन जीवघेणी अस्थिती उद्धवू शकते.

ओलिंडर (कण्हेर) :  या झाडाची पाने व फळे अतिशय विषारी असतात. चुकून सेवन केल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. औषधी वापर फक्त बाह्य मलमापुरता मर्यादित असतो.

लिली : सुंदर फुलांमुळे लोकप्रिय असते तरी लिलीची झाडे विशेषतः मांजरींसाठी अत्यंत घातक आहेत. पाने खाल्ल्यास उलट्या, जुलाब व चिडचिड होऊ शकते.

इंग्लिश आयव्ही : याची पाने व बेरी खाल्ल्यास पोटदुखी, उलटी, अशक्तपणा व त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवणे गरजेचे आहे.

धोत्रा : धार्मिक महत्व असले तरी धोत्रा अत्यंत विषारी आहे. याचे फुल वा फळ सेवन केल्यास बेशुद्धी, झटके, भ्रम तसेच मृत्यूही होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment