होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाने पुन्हा भारताच्या जखमेवर मीठ चोळलं; नेमकं काय घडलं?

On: February 13, 2026 4:57 PM
Follow Us:
---Advertisement---

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्डकप 2026 मधील 19व्या सामन्यात झिम्बाब्वेने अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केले. विशेषतः नाणेफेकीचा कौलही ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. असे असतानाही ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ट्रेव्हिस हेडने 2023 वनडे वर्ल्डकपचा उल्लेख करून भारताच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 169 धावा केल्या. विजयासाठी आवश्यक 170 धावांचे लक्ष्य ठरवताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकात 146 धावांवर गारद झाला.  आता ऑस्ट्रेलियाला सुपर 8 फेरीसाठी उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. पुढील सामना 16 फेब्रुवारीला श्रीलंकेशी आणि 20 फेब्रुवारीला ओमानशी होणार आहे.

काय म्हणाला ट्रेव्हिस हेड

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ट्रेव्हिस हेड म्हणाला की, “आमच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडूंनी 2023 वर्ल्डकपमध्ये भारतात सामना खेळून मार्ग काढला होता. त्याचा अनुभव आम्ही आता आत्मविश्वासासाठी वापरणार आहोत.”

2023 मध्ये काय घडलं ?

दरम्यान, 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट आणि 52 चेंडू राखून पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाने दिलेले 199 धावांचे आव्हान 41.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केले होते. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 134 धावांनी पराभूत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग 7 सामने जिंकले आणि उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेला 3 विकेट आणि 16 चेंडू राखून मात दिली. तर अंतिम फेरीत भारताला 6 विकेट आणि 42 चेंडू राखून पराभूत केले आणि जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे ट्रेव्हिस हेडने हा संदर्भ देत भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment