जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यक्रमस्थळ व जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमित केला आहे.
दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत जळगाव विमानतळ व जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रम परिसरात ड्रोन तसेच तत्सम उडणाऱ्या यंत्रणांच्या वापरावर व प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चा कलम १६३ (१)(३)नुसार एकतर्फी पद्धतीने निर्गमित करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम २२१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.









