होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Rajya Sabha Election : ..अखेर राज्यसभा निवडणूक बिनविरोध! शिवसेना (शिंदे गट) दुसरा उमेदवार देणार नाही

On: March 5, 2026 4:16 PM
Follow Us:
---Advertisement---

Rajya Sabha Election : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेमुळे (शिंदे गट) हा ट्विस्ट आला असून आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदेंच्या शिवसेनेने 2 उमेदवार देण्याऐवजी एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला. तर रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील एकूण सात जागांसाठी सात अर्ज दाखल झाले. त्यामुळे बिनविरोध निवडीची औपचारिकता शिल्लक आहे.

 

या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त तीन मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दुसरा उमेदवार देणार आणि शरद पवारांपुढे आव्हान निर्माण करणार असं चित्र होतं. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नाही आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार, भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे.

 

शरद पवार-पार्थ पवारांचे दोन अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकादा अर्ज जरी चुकून बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहणार आहे.

 

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सात उमेदवार

भाजपचे उमेदवार – रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते.

शिवसेना शिंदे गट- ज्योती वाघमारे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- पार्थ पवार.

महाविकास आघाडी – शरद पवार.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Maharashtra Drought: पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा – मंत्री गुलाबराव पाटील

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना केलं अभिवादन

बोरीवलीत सुमारे १० कोटी रुपये किमतीचे २ किलो हेरॉइन जप्त; तिघे अटकेत

दुर्दैवी घटना: गरबा खेळण्यासाठी आश्रमशाळेतून पाच विद्यार्थी पळाले अन् रस्ता अपघातात जीव गमावला

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Leave a Comment