जळगाव : आईच्या डोळ्या देखत मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रावेर तालुक्यात समोर आली आहे. वनसिंग सदू भिल (वय ३४) रा. हरण्याकुंड, जि. खरगोन, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रावेर तालुक्यातील पाल येथील मोरव्हाळ फाट्यावर झालेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. जखमी सोनीबाई सदू भिल (वय ४८) यांना तातडीने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मध्यप्रदेशहून पालकडे येणारी दुचाकी, क्रमांक एम. पी. १० जे. ११३८ आणि एक स्कूल बस यांच्यात हा अपघात झाला. या प्रकरणी स्कुल बस चालक संतोष भुरा राठोड, रा. गुलाबवाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरुन वनसिंग आणि सोनाबाई यांना उपचारासाठी रावेरला आणताना वनसिंगचा मृत्यू झाला. पुढील तपास पोहेकॉ इश्वर चव्हाण करत आहेत.









