जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्र. १४ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शहीद अब्दुल हमीद चौक येथे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जामनेरचे नगरसेवक जावेद मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक लाडवंजारी, तडवी नाजमीन मकबुल, सना शेख रियाज, जमिलोद्दीन शेख शारीफुद्दीन शेख हे प्रभाग क्र. १४ मधून रिंगणात आहेत. यांच्या प्रचारार्थ दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शहीद अब्दुल हमीद चौक येथे भुसावळची मुलुख मैदान तोफ माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जामनेरचे नगरसेवक जावेद मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन कल्लु खाटीक, ईसा व्यापारी, मुस्तफा मिर्झा, फिरोज खान, नईम खाटीक, नदीम शेख, रफीक शहा, सलीम काकर, डॉ. रिजवान खाटीक, सुभाष घुगे, अकिल पेंटर्स, गोपाळ हटकर, अफसर खाटीक, योगेश लाडवंजारी आदींनी केले आहे.









