होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

दुर्दैवी! गावाकडे निघाले अन् काळाने गाठलं, पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

On: January 10, 2026 6:05 AM
Follow Us:
---Advertisement---

नवापूर : तालुक्यातील पानबारा शिवारात महामार्गावर भरधाव मालट्रकच्या धडकेत पत्नी ठार तर पती जखमी झाल्याची घटना घडली. धडक देणारा मालट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर त्याने पळ काढला होता. परंतु सोनखांब गावाजवळ त्याला ग्रामस्थांनी पकडले. याबाबत विसरवाडी पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबनीबाई अशोक कोकणी (वय ४०, रा. नावली, ता. नवापूर) असे मयत महिलेचे नाव असून अशोक रामचंद्र कोकणी हा जखमी झाला आहे. अमित आत्माराम लंगर (रा. गोंधरी, ता. औसा, जि. लातूर) असे संशयित चालकाचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनुसार, कोकणी दाम्पत्य हे त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ एस २१३९) नावली गावाकडे जात होते. महामार्गावर पानबारा गावाच्या शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपासमोर भरधाव मालट्रकने (क्रमांक टीएस ०८ क्यूबी ६३१५) मागून जबर धडक दिली.

धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी काही अंतरापर्यंत ट्रकने फरफटत नेली. यात कोकणी दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. दोघांना गंभीर मार लागला. लागलीच त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे जबनीबाई अशोक कोकणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अशोक कोकणी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर त्याच मार्गावरून पिंपळनेरकडे जात असलेले शिक्षक ललित चौरे यांनी तत्काळ महामार्गावरील रुग्णवाहिका क्रमांक १०३३ ला माहिती दिली. रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी नरेंद्र साबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment