होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Crime : शेअर ट्रेडिंगची माहिती शोधली अन् गमावले तब्बल दीड कोटी

On: January 29, 2026 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधली अन् अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडल्याने एका सेवानिवृत्ताची तब्बल एक कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले, तिवारी नगरातील रहिवासी ६१ वर्षीय वृद्धाने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली. तेथे दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकला त्यांनी क्लिक केले असता एका ग्रुपमध्ये ते जोडले गेले.

त्यात त्यांना शेअरविषयी माहिती देण्यात आली. एका शेअरमधील गुंतवणूकविषयी लिंक पाठविली. त्यावरील सुचनेनुसार पैसे भरुनही नफा तर दूरच मात्र भरलेले १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयेदेखील मिळाले नाही.

टॅक्सच्या नावे घेतली रक्कम

सेवानिवृत्ताने २५ सप्टेंबर रोजी ५० हजार रुपये शेअरमधील गुंतवणुकीसाठी ऑनलाइन पाठविले. त्यावर अधिक नफा होत असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी ७८ लाख ३५ हजार रुपये शेअर खरेदीसाठी पाठविले.

त्यावर त्यांना ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ३३८ रुपये जमा झाल्याचे दिसत होते. ती रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता त्यांना समोरील महिलेने १० टक्के सव्र्व्हस टॅक्स भरण्यास सांगितला.

तो त्यांनी भरला. त्यानंतर पुन्हा १५ टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरण्यास सांगितल्याने त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी ५ लाख, ३० नोव्हेंबर रोजी ८ लाख २२ हजार ३७५ रुपये ऑनलाइन पाठविले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment