होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दुर्दैवी! कॉलेज आटोपून घरी निघाली अन् काळाची झडप; घटनेने भडणे परिसर सुन्न

On: January 23, 2026 11:55 AM
Follow Us:
---Advertisement---

Shindkheda Accident : कॉलेज आटोपून पायी घरी निघालेल्या तरुणीला भरधाव व चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाने चिरडल्याची घटना शिंदखेड्यात घडली. प्रियांका कोळी (वय १९, रा. भडणे ) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेने भडणे परिसर सुन्न झाला आहे.

मृत प्रियंका शिंदखेड्यातील एस.एस.व्ही.पी. एस. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी (दि.२२ जानेवारी ) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ती कॉलेज आटोपून पायी घरी निघाली होती.

दरम्यान, भरधाव व चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका पाणी पुरवठा करणाऱ्या वाहनाने तिला जोरदार धडक देत, ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाले.

या धडकेत प्रियांकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला.

प्रशासनाचे दुर्लक्ष, निष्पाप नागरिकांचा बळी

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरत म्हटले की, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, वाहतूक पोलिसांची अपुरी कारवाई आणि धोकादायक चौकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे.

ठोस उपाययोजनांची गरज

भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई, नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य आणि नियमांची प्रभावी अंबलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment