होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Bharat Bandh on 12th February : उद्या भारत बंदची हाक; काय कारण?

On: February 11, 2026 4:59 PM
Follow Us:
---Advertisement---

Bharat Bandh on 12th February : नवीन लेबर कोड व भारत-अमेरिकेतली व्यापारी कराराविरोधात उद्या गुरुवारी (दि.12) देशातील विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. परिणामी कामगार वर्ग, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत-अमेरिका व्यापारी करार, नवीन कामगार कायदे, BV-GRG , मनरेगाचा बदल आदी मुद्यांविरोधात देशातील विविध कर्मचारी संघटना, शेतकरी आक्रमक झाले आहे. उद्या गुरुवारी (दि.12) रोजी होणाऱ्या भारत बंदमध्ये 10 केंद्रीय ट्रेड युनियन (INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC) चा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहेत मागण्या ?

  • भारत-अमेरिका व्यापारी करार, नवीन कामगार कायदे, BV-GRG , मनरेगाचा बदल आदी कायदे रद्द करा.
  • प्रस्तावित सीड बिल, विद्युत संशोधन बिल आणि SHANTI कायदा मागे घ्या.
  • मनरेगा पुन्हा मजबूत करा.
  • ‘विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण) अधिनियम 2025’ रद्द करा.

सर्वात जास्त परिणाम कुठे होईल?

  • कर्नाटक, केरळ आणि ओडिसा राज्यात याचा जास्त परिणाम दिसण्याची शक्यता.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता.
  • त्यामुळे काही शाळा, महाविद्यालये बंद असू शकतात.
  • काही बँकांतील कामकाजावरदेखील परिणाम होण्याची शक्यता.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment